
देवगड : देवगड तालुक्यातील ३० गावांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष तळवडेकर, उपाध्यक्ष अमोल जाधव, सचिव मोहनिश मुंबरकर, सहसचिव अनिकेत मिठबांवकर, राकेश मिठबांवकर, सल्लागार रत्नदीप दयाळ कांबळे (पत्रकार), सुमित जाधव, सागर शामसुंदर ओंबळकर, अस्मित कदम, सुहास मिठबांवकर, अक्षय मिठबावंकर, कार्यकारिणी सदस्य पार्थ कदम, शैलेंद्र मिठबावंकर, जीवन कदम, समीर ढोके इत्यादींसह बहुसंख्य युवा संघटक आदी उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपावी, विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये सहकार्य करावे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षणाचा मूलमंत्र सर्व समाजात पोहचवून जास्तीत जास्त समाज शिक्षणाकडे वळावा यासाठी विद्यार्थ्यांना साहित्य वाटप हा कार्यक्रम शनिवार दिनांक ५जुलै २०२५ व रविवार दिनांक ६ जुलै २०२५ या दोन दिवसांत संपन्न करण्यात आला यावेळी तालुक्यातील तीस गावांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या दोन दिवशीय दौऱ्यामध्ये विद्यार्थी व पालकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
ह्या कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध विहार मिठबांव येथून करण्यात आली.
यावेळी देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाचे माजी अध्यक्ष जयवंत मिठबावकर यांनी युवा प्रतिष्ठान शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम अतिशय समाज उपयोगी उपक्रम आहे व असेच चांगले सामाजिक काम युवांनी करून समाज पुढे नेला पाहिजे. अशी प्रतिक्रिया दिली व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. आरे गावातील माजी पंचायत समिती सदस्य व तालुका बौद्धजन सेवा संघाचे माजी उपाध्यक्ष अजित बाबू कांबळे यांनी युवा प्रतिष्ठानला शुभेच्छा देताना "अल्पावधीतच डॉ बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान ही संघटना युवा वर्गाने स्थापन केल्यापासून चांगली हवा निर्माण करून शैक्षणिक साहित्य वाटप या कार्यक्रमातून युवा वर्ग सामाजिक बांधिलकीच्या हेतूने प्रेरित होऊन अतिशय चांगले काम करीत आहोत, त्यांच्या या कामाला शुभेच्छा" असे गौरवोद्गार काढले. मिठमुंबरी, हिंदळे यासारख्या बऱ्याच गावांमध्ये देखील चांगल्या प्रतिक्रिया युवा प्रतिष्ठानला मिळत होत्या.