दोडामार्गात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भव्य स्वरूपात होणार साजरी

Edited by:
Published on: April 11, 2026 16:07 PM
views 13  views

दोडामार्ग : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी दोडामार्ग तालुक्यात भव्य व दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, अभ्यासक, जाणकार, ज्येष्ठ तसेच सुशिक्षित युवक-युवती आणि महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग या जयंती महोत्सवात अपेक्षित आहे.

दोडामार्ग येथील महालक्ष्मी हॉल येथे सकाळी ९.३० वा. हा कार्यक्रम पार पडणार असून अध्यक्षस्थानी अंकुश विष्णू जाधव (अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोडामार्ग तथा माजी समाजकल्याण सभापती, सिंधुदुर्ग) हे असणार आहेत. सम्यक संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे भन्ते सचित बोधी यांचे बौद्ध धम्म प्रवचन हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. यावेळी प्रमोद कामत (अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग), बाबुराव धुरी (जिल्हाप्रमुख, शिवसेना उबाठा सिंधुदुर्ग) हे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून रमाकांत जाधव (सहसचिव, आर.पी.आय. आठवले महाराष्ट्र प्रदेश) व बुद्धभूषण हेवाळकर (अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दोडामार्ग) उपस्थित राहणार आहेत.

तसेच विशेष निमंत्रित म्हणून राहुल गुरव (तहसीलदार, दोडामार्ग), अजिंक्य सावंत (गटविकास अधिकारी, पंचायत समिती दोडामार्ग), हेमचंद्र खोपडे (पोलीस निरीक्षक, दोडामार्ग), राहुल गायकवाड (मुख्याधिकारी, नगर पंचायत कसई-दोडामार्ग), चेतन चव्हाण (नगराध्यक्ष, नगर पंचायत कसई-दोडामार्ग) यांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय विजय जाधव (कार्याध्यक्ष, जयंती उत्सव समिती तथा जिल्हा उपसंघटक शिवसेना उबाठा), गणेशप्रसाद गवस (तालुका प्रमुख, शिवसेना तथा उपसभापती पं.स. दोडामार्ग), प्रविण गवस (जिल्हाध्यक्ष, सरपंच सेवा संघ सिंधुदुर्ग), दीपक गवस (तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी दोडामार्ग तथा जि.प. सदस्य), संजय गवस (तालुकाप्रमुख, शिवसेना उबाठा), सौ. पार्वती गवस (सभापती, पं.स. दोडामार्ग), शंकर मधुकर जाधव (अध्यक्ष, संबोधी बहुउद्देशीय तालुका संस्था दोडामार्ग), अर्जुन कदम (माजी अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दोडामार्ग), लक्ष्मण आयनोडकर (सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रमुख शिवसेना उबाठा), व्ही. ए. कदम (केंद्रीय अध्यक्ष, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई), हरिश्चंद्र मणेरकर (सिंधुदुर्ग जिल्हा महासचिव, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), दीपक जाधव (अध्यक्ष, समाज जागृती मंच दोडामार्ग), प्रकाश कांबळे (जिल्हा सरचिटणीस, आर.पी.आय. आठवले सिंधुदुर्ग), मधुकर कदम (जिल्हा संघटक, वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग), केशव आयनोडकर (अध्यक्ष, युवा परिवर्तन संघटना दोडामार्ग), रामदास कांबळे (दोडामार्ग तालुका अध्यक्ष, आर.पी.आय. आठवले) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष भिवा आवनोडकर, सदाशिव आयनोडकर, विठ्ठल घोटगेकर, भगवान जाधव, खजिनदार संतोष जाधव, सहखजिनदार सिताराम जाधव, सल्लागार गणपत लाडू कांबळे, सहसचिव सखाराम कदम, सागर कांबळे, सदस्य गुरुदास जाधव व अर्जुन आयनोडकर यांच्यासह संबोधी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष शंकर झिलू जाधव, सचिव संदिप जाधव तसेच स्वागताध्यक्ष सौ. ज्योती जाधव (नगरसेविका, कसई-दोडामार्ग) आणि श्रामणेर अर्जुन कदम, श्रीधर जाधव व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० वाजता प्रतिमा पूजन, बुद्ध वंदना व त्रीसरण पंचशीलाने होणार असून त्यानंतर सकाळी १०.३० वा. इयत्ता १० वी, १२ वी व पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. सकाळी ११.३० ते दुपारी २.०० या वेळेत मान्यवरांची मनोगते होणार असून दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी ३.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत भीमगीते व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून सायंकाळी ५.०० वा. दोडामार्ग शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या जयंती महोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी स्वागत, संयोजन, भोजन, स्वच्छता, स्टेज सजावट, बैठक व्यवस्था, प्रचार-प्रसिद्धी, मिरवणूक सुरक्षा व सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध समित्या स्थापन करून जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या भव्य जयंती महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.