
- उद्या रविवार १२ एप्रिल रोजी आयोजन
- आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
कुडाळ : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने कुडाळ नगरपंचायतीमध्ये दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत नोंदणीकृत झालेल्या महिला बचत गटांसाठी उद्या रविवार १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल क्र. २ येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामधील कुडाळ शहरातील नगरपंचायतीमध्ये दीनदयाळ अंतोदय योजनेअंतर्गत नोंदणीकृत झालेल्या महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याला आमदार निलेश राणे तसेच महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन करणारी मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. तरी नगरपंचायतीमध्ये नोंदणी झालेल्या सर्व महिला बचत गटांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी केले आहे.










