
सावंतवाडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सोनुर्ली-जाधववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन नवयुवक क्रीडा मंडळ, सोनुर्ली-जाधववाडी यांच्या वतीने रविवार २८ करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाने होईल. त्यानंतर सकाळी ९:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सकाळी १०:३० वाजता आय केअर सावंतवाडी यांच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा शिबिर व मोफत औषधोपचार तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून सोनुर्ली हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक, ॲड. प्रदीप सावंत उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत ठाकूर विशेष अतिथी सोनुर्ली सरपंच नारायण हिराप उपसरपंच भरतगावकर पोलीस पाटील संदीप मोगम सामाजिक कार्यकर्ते नागेश गावकर उपस्थित राहणार आहेत.
तर यानिमित्त सायंकाळी ४ वाजता भव्य दिव्य जय भीम रॅली सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये मुलांचे रेकॉर्ड डान्स त्यानंतर रात्री ८:३० वाजता सामूहिक भीमगीत गायनाचा कार्यक्रम होईल.
या स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी रु. ५,०००/- (प्रथम पारितोषिक), रु. ३,०००/- (द्वितीय पारितोषिक), आणि रु. २,०००/- (तृतीय पारितोषिक) तसेच सन्मानचिन्हे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गायकांसाठी काही नियम आणि अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नवयुवक क्रीडा मंडळ, जाधववाडी-सोनुर्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे.