डॉ. आंबेडकर हे देशातील प्रत्येक माणसाचे प्रेरणास्थान : मंत्री केसरकर

Edited by:
Published on: April 17, 2024 08:24 AM
views 101  views

दोडामार्ग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातील प्रत्येक माणसांचे प्रेरणास्थान आहे.भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून आंबेडकर यांचे देशामध्ये महान स्थान आहे. या व्यक्तिमत्वच्या विचारसराणीतून देशाची उभारणी होत आहे. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा आदर्श घावा असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री मा. ना. दिपकभाई केसरकर यांनी दोडामार्ग तालुकास्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली त्या कार्यक्रमाला मा.केसरकर यांनी उपस्थित राहून उपस्थित आंबेडकारी जनतेला आवाहन करत शुभेच्छा दिल्या.

भारतीय संविधानाचे शिल्पकार प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती तालुकास्तरीय भव्य जयंती उत्सव रविवार दि.१४ एप्रिल २०२४ रोजी आर.पी.आय.(आठवले), सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ (मुंबई),तालुका शाखा दोडामार्ग,जय भीम युवा मंडळ रमाईनगर झरेबांबर आणि भीम वॉरीयर्स पंचशील नगर दोडामार्ग यांच्या सयुक्त विद्यमाने दोडामार्ग येथील महाराजा हॉल मध्ये मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री मा.ना.दिपकभाई केसरकर यांनी भेट देवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी उपस्थित आंबेडकरी जनसमुदायाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे आर.पी.आय.(आठवले) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव मा.रमाकांत जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अर्जुन आयनोडकर (उपसरपंच ग्रा.पं. झरे-२ तथा खजिनदार सिंधुदुर्ग बौध हितवर्धक महासंघ मुंबई तालुका शाखा दोडामार्ग), विशेष निमत्रित मा.शंकर झिलू जाधव (सचिव आर.पी.आय.(आठवले) कोकण विभाग तथा अध्यक्ष सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ (मंबई) तालुका शाखा दोडामार्ग), प्रमुख वक्ते आदरणीय धम्मचारीणी यशोमती (त्रिरत्न बौध्द संघ सिंधुदुर्ग),माजी समाज कल्याण सभापती जि.प.सिंधुर्ग मा.अंकुश जाधव,आर.पी.आय.(आठवले) जिल्हा सरचिटणीस मा.प्रकाश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मा.चंद्रकांत जाधव, कार्याध्यक्ष मा.सखाराम कदम, दोडामार्ग तालुका अध्यक्ष आयु.रामदास कांबळे, उपाध्यक्ष मा.मनोहर जाधव,सचिव मा.नवसो पावसकर,कार्याध्यक्ष प्रेमानंद पालयेकर,कसई-दोडामार्ग नगरसेविका श्रीमती. ज्योती  जाधव श्रीमती. क्रांती जाधव,पत्रकार शंकर जाधव, मा.संदीप जाधव (सचिव जय भीम युवा मंडळ रमाईनगर झरेबांबर),आयी गावचे माजी उपसरपंच लाडू जाधव, आंबडगाव पोलीस पाटील सत्यवान जाधव,सासोली ग्रा.पं. सदस्य जागृती कदम, कोनाळकट्टा पोलीस पाटील सेजल बांदेकर उपस्थित होत्या. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांच्या समावेत शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र निंबाळकर, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, उपतालुका प्रमुख दादा देसाई, रामदास मेस्त्री युवासेना तालुका प्रमुख भगवान गवस उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बुद्ध वंदना आणि पंचशील म्हणून कार्यक्रमाला रितसर सुरुवात करण्यात आली.

यावेळी आर.पी.आय.(आठवले)महाराष्ट्र प्रदेश सहसचिव मा.रमाकांत जाधव म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यक्तिमत्व हे महान आहे. त्यांचे त्यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या विचाराणे प्रेरित होऊन समाजामध्ये त्यांचे विचार पोहचविण्याच्या दृष्टीने काम कराव. बाबासाहेब हे आपले प्रेरणास्थान आहे. संविधान जपण्याची आणि चिरकाळ टिकवून ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. युवकांनी बाबासाहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन बाबासाहेबांना जितक समजून घेणार तितकी आपण आपली प्रगती करणार,संघटित होण्यासाठी चळवळ आवश्यक आहे.जयंती ही प्रबोधनाच एक माध्यम आहे. बाबासाहेबांचे विचार समजून घेऊन झपाट्याने जोमाने प्रगती करूया.आपण सर्वांनी गावागावात समाजाला सुसंघटित करण्याच काम करूया. त्यांचे विचार सांगण्याचे काम करूया, सुशिक्षित आणि सृजनशील समाज घडूया असे आवाहन मा. रमाकांत जाधव यांनी केले.

शिवसेना तालुका प्रमुख गणेशाप्रसाद गवस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीला राज्यघटनेच्या माध्यमातून समान न्याय दिलेला आहे. त्यांनी केलेले कार्य हे नवीन पिढीला माहिती असायला हवे, त्यांचा इतिहास माहिती व्हावी यासाठी असे कार्यक्रम व्हावेत. घटनेच्या माध्यमातून सर्वासामान्य माणसाला अधिकार मिळाला. त्याकाळी शिक्षण घेण्याची एवढी परिस्थिती नव्हती, कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतले. आपणा सर्वांना शिक्षणाचा अधिकार राज्य घटनेच्या माध्यमातून मिळाला. बाबासाहेब यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणाने काम करावे. मा. गणेशप्रसाद गवस यांनी आवाहन केले.

माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव म्हणाले की, आपला समाज हा प्रगतीच्या उच्च पदावर गेला का?  याचा विचार करण्याची आज गरज आहे.बाबासाहेबांच्या विचाराचा उपयोग समाजाला झाला पाहिजे. बाबासाहेबांनी आपली उभी हयात अनुयायांसाठी घालविली. समाजामध्ये सुधारणा झाली पाहिजे.आपल्या विचारामध्ये, वैचारीक बदल झाला पाहिजे. समाज सुधारण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे. एका दिवसापुरते नेते न होता सतत पुढाकार घेऊन बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत नेवून बाबासाहेबांना जो अपेक्षित समाज हवा होता तो घडविण्यासाठी काम करून नेते बना. युगपुरुषांची चरित्र वाचली पाहिजे तरच आपण आपली प्रगती करू शकणार. कायद्याने जात,अस्पृशता,शिवा शिव नष्ट झाली मात्र आजही सुप्त जातीयवाद गल्ली पासून दिल्ली पर्यंत आहे. येणारा काळ हा संघर्षाचा असणार आहे. यापुढे शिक्षण घेतलेला टिकणार आहेत. यासाठी आपण आपली शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती करा. चुकीच्या दिशेने न जाता आपण सर्वांनी निळ्या झेंड्याखाली एकत्र यावे असे आवाहन मा.अंकुश जाधव यांनी केले.

बाबासाहेब मानने, जाणने आणि त्यांच्या विचाराणे जाण हा एक फरक आहे.आज बाबासाहेबांचे विचार जाणून घेऊन त्यांच्या विचारांचे आचारण करणे आज खरी गरज आहे.सर्वचजण बाबासाहेबांना मानतात पण सर्वजण त्यांच्या विचारांचे आचारण करतात का? हा खरा प्रश्न आहे. आज बाबासाहेबांचे विचार जाणून घेऊन त्यांच्या विचाराणे काम कारणारेच समाज परीवर्तन घडवून आणत असतात. तसेच आज बौद्ध धम्माची चळवळ गतिमान करण्याची आवश्यकता असल्याचे आव्हानात्मक प्रतिपादन धम्मचारिणी यशोमती यांनी केले.यावेळी विचार मंच्यावर उपस्थित मान्यवर व्यक्तींनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्थाविक संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन शंकर जाधव तर आभार प्रकाश कांबळे यांनी मानले.