तुम्ही सापडू नका ; पालकमंत्र्यांचा गर्भित इशारा !

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 16, 2024 07:48 AM
views 169  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्टेशन चांगली व्हावीत असे मला वाटले म्हणून निधी दिला.य स्थानकांच्या सुशोभीकरण कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केला. मी ही स्टेशन तात्काळ पूर्ण होतील असे सांगितले.पण ही कामे पूर्ण होत नाहीत ज्याने काम घेतलीत त्याला मी फोन केला. काम पूर्ण का होत नाहीत असे विचारले तर तो म्हणाला मला कामांच्या ठिकाणीं यायला दिले जात नाही. काय चाललेय हे ? जिल्ह्यातील ठेकेदारांचे नाव न घेता आपण काम करायची नाहीत आणि दुसऱ्याला जो करतोय त्याला काम करायला द्यायचं नाही ही काय स्थिती आहे. त्यामुळे जे कामे करत नाहीत त्या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करा. लोक रस्त्यात थांबवितात. गुष्च द्यायला नाही तर कामे झाली नाहीत म्हणून.किती वाईट आहे.हे तात्काळ कारवाई करा अन्यथा मी कारवाई करीन, अशा शब्दात खडसावले.

 जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी तब्बल साडे सहा कोटी रुपये दिले. मी अपघाताने पालकमंत्री आहे. अजून किमान तीनचार महिने आहे. या तीन-चार महिन्यात जिल्ह्यात जो निधी दिला आहे तो व्यवस्थित खर्च झाला पाहिजे. या कालावधीत खूप काही करून जाणार आहे. मात्र  यामध्ये तुम्ही सापडू नका असा गर्भित इशारा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिला.