
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन सभा. शासनाचे पैसे खर्च न झाल्याने ते परत जाणार हे गेले दोन वर्ष पडून आहेत. हा निधी प्रांत आणि कुडाळ नगर पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी य दोन पदांमुळे जे रखडल आहे. त्यामुळे यात दोघां पैकी कुणाला दोषी ठरवायचं ते सांगा. असे सांगत जे जे असे विषय आहेत लोक कल्याणाचे ते करण्यात आपल्याला काहीच रस नाही आपला लक्ष इतर कामातच आहे. लोकांच्या सुविधे साठी एखाद गार्डन व्हावं असं लोक प्रतिनिधींना वाटल तर ते चुकीचं आहे का? असा सवाल करत कुडाळ भंगसाळ नदी जवळील गेले दोन वर्ष रखडलेल्या गार्डनवरून नाराज झालेल्या पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.