आंबव पोंक्षे येथे डीपीचं उदघाटन

Edited by:
Published on: April 06, 2025 11:39 AM
views 59  views

भुवडवाडी, पकडेवाडी ची समस्या कायमची सुटली*


माखजन, (ता.५) : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथे भुवडवाडी व पकडे वाडी साठी स्वतंत्र इलेक्ट्रीक डीपी चालू करण्यात आला आहे. या विजेच्या नवीन डीपी चे उदघाटन चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वतंत्र डीपी मिळावा यासाठी आमदार शेखर निकम यांनी महावितरणकडे विशेष प्रयत्न केले होते. पकडेवाडी ,भुवडवाडी मध्ये विद्युत भारामध्ये होणारा सतत चा चढउतार याचा येथील रहिवाशांना सारखा सामना करावा लागत होता. गणपती मध्ये तर येथील व्होल्टेज पूर्णपणे कमी होत असे. यामुळे येथील राहिवाशांची दोन्ही वाड्याची  स्वतंत्र डीपी मिळावा अशी महावितरण कडे अनेक वर्षांपासूनची मागणी होती. आमदार शेखर निकमांनी या समस्येकडे विशेष लक्ष देऊन, ती मागणी पूर्ण करून दिली.  मतदार संघातील प्रत्येक गावाला उन्नतीकडे नेण्यासाठी आपला कसोशीने नेहमीच प्रयत्न राहील असा शब्द त्यांनी मनोगतावेळी व्यक्त केला.

डीपी च्या उदघाटन प्रसंगी संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे मुंबई संपर्क प्रमुख सुरेश घडशी, आंबा पोंक्षे गावचे सरपंच शेखर उकार्डे, गौरव पोंक्षे,गावकर मोहन घडशी,संजय पकडे,सुरेश भुवड,दाजी भुवड,देवजी भायजे, राजेंद्र जाधव,दीपक शिगवण, मंगेश शिगवण,विजय पकडे, आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.