
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शाळा निरवडे कोनापाल नंबर २ चा विद्यार्थी शंभू गणपत पांढरे हा जिल्हा गुणवत्ता यादीत तिसरा व सावंतवाडी तालुका गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेला आहे. तसेच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाही तो उत्तीर्ण होऊन नवोदय प्रवेशासाठी पात्र ठरलेला आहे.
त्याच्या या यशाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी निरवडेचे माजी सरपंच प्रमोद गावडे, ग्रा. प. सदस्य दशरथ मल्हार, प्रगती शेटकर, रेश्मा पांढरे, आदेश जाधव तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बाईत, सामाजिक कार्यकर्ते रमेश पांढरे, शिक्षणप्रेमी बाळा बाईत, मुख्याध्यापक दत्तकुमार फोंडेकर, नीलम कानसे, नारायण नाईक, उदेश नाईक, स्वप्नाली गरड आदी उपस्थित होते. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.