कोल्हापूर विभागीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिर कुडासे प्रशालेचे दुहेरी यश

१४ वर्षाखालील मुले उपविजयी तर १७ वर्षाखालील मुले तृतिय
Edited by:
Published on: October 18, 2024 07:57 AM
views 38  views

दोडामार्ग : क्रीडा व यूवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सांगली अयोजित सांगली येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना सरस्वती विद्यामंदिर,कुडासे ता.दोडामार्ग* या प्रशालेने १४ वर्षाखालील मुलांच्या गटात उपविजयी तर १७ वर्षाखालील गटात तृतिय क्रमांक मिळविला १४ वर्षाखालील गटातून सुरज बाबाजी देसाई व १७ वर्षाखालील गटातून बाळा शंकर गवस या दोघांची राज्यस्तरीय स्पर्धासाठी निवड झाली. धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संस्था अध्यक्षा कल्पनाताई तोरसकर,कार्याध्यक्ष डाॅ.मिलिंद तोरसकर,सचिव संतोष सावंत,खजिनदार वैभव नाईक,समन्वय समिती सचिव रश्मीताई तोरसकर,सहसचिव नंदकुमार नाईक,समन्वय समिती सदस्य सतिश मोरजकर,प्रशालेचे मुख्याध्यापक जे.बी.शेंडगे,ज्येष्ट शिक्षक एस.व्ही.देसाई,एल.के.डांगी,पी.बी.किल्लेदार,कुडासे ग्रामपंचायत सरपंच तथा शालेय समिती सदस्य पूजा देसाई,उदय गवस,बाबाजी(दादा)देसाई,प्रकाश कुडास्कर,राजाराम मेस्री,मंगेश गवस,संजय धुरी,प्रशालेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,कुडासे पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना प्रशालेचे क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी यांचे मार्गदर्शन लाभले