कणकवलीत डबलबारी सामना..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 04, 2023 16:21 PM
views 375  views

कणकवली : कणकवलीत धुमाळे परिवाराच्या वतीने गणेश चतुर्थी निमित्त ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जंगी डबलबारी भजनाच्या दुरंगी सामन्याचा आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध बुवा संदीप लोके व संतोष जोईल यांच्यामध्येही ही जंगी डबलबारी रंगणार असल्याचं आयोजक जयेश धुमाळे आणि प्रसाद धुमाळे यांनी सांगितले.

30 सप्टेंबर  रोजी पावसानिमित्त ही डबलबारी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा या डबलबारीचे नियोजन धुमाळे परिवाराकडून करण्यात आले आहे. स्थळ बाळ धुमाळे यांच्या निवासस्थानी कणकवली बाजारपेठ येथे ही डबल बारी होणार आहे. तरी भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त धुमाळे परिवाराकडून  करण्यात आले आहे.