
वैभववाडी : सडुरे-शिराळे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या प्रचारात काळे दापत्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. दोन्ही उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत.
गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नवलराज काळे प्रभाग तीन मधून सदस्य पदाकरिता निवडणूक रिंगणात आहेत. तर प्रभाग दोन मधून विशाखा काळे निवडणूक लढवित आहेत. दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन मतपत्रिका देत आहेत. तसेच निवडणूक जाहीरनामा मतदारांपर्यंत पोहचवत आहेत. मतदारांकडून दोन्ही उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.