
देवगड : कोकणची राख करणारे रिफायनरी सारखे प्रकल्प इथे नकोत. येथील भागाचा शाश्वत विकास करणारे प्रकल्प येथील जनतेला हवे आहेत.कोकणची राख करून गुजरातला रांगोळी घालणं आम्ही कदापी होऊ देणार नाही.महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर कोकणात आंबा फळ प्रक्रियांचे प्रकल्प आणले जातील.येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
देवगड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी श्री.ठाकरे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर संदेश पारकर, गौरीशंकर खोत, परशुराम उपरकर,सतिश सावंत, अतुल रावराणे, सुशांत नाईक,किरण टेंबुलकर,अनंत पिळणकर, स्वप्नील धुरी,विवेक ताम्हणकर मिलींद साटम,प्रसाद करंदीकर यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, मोदींनी महाराष्ट्रातील चांगले प्रकल्प गुजरातला पळवले.कोकणची राख करणारे नाणार,बारसू, जैतापूर यासारखे प्रकल्प येथे आणले.महाराष्ट्राची राख करून गुजरातला रांगोळी करायला आम्ही देणार नाही. येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी फळ प्रक्रिया, पर्यटन उद्योग आणणार आहोत.त्याद्वारे येथील आंब्याची उत्पादने जागतिक स्तरावर जातील.या पद्धतीने शाश्वत विकास आम्ही करणार आहोत.एकीकडे महीलांना बहीण म्हणायचे त्यांचं महीला राज्यात असुरक्षित आहेत.यांना निवडणूका आल्या की बहीणी आठवतात.हे कोणाचे भाऊ होऊ शकत नाहीत.देवा भाऊ आणि मिळून खाऊ असाच यांचा प्रकार आहे.महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राज्यातील महीलांना घरखर्चासाठी तीन हजार,सहा सिलिंडर व एसटी प्रवास मोफत देणार असल्याचे आश्वासन दिले.
भाजपाच्या बटेंगे तो काटेंगे या घोषवाक्यवरून श्री ठाकरे यांनी जोरदार टिका केली.बटे़गे,कटेंगे याच्यापुढे भाजपा गेली नाही.जाती धर्मात तेढ निर्माण करून यांना सत्ता हवी आहे.पण आता "एक रहेंगे तो भाजपसे दो हात सेफ रहेंगे"अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.हिंदुत्वावादी आम्ही पण आहोत .पण आमचं हिंदुत्व मोदींसारखे नाही.आमच हिंदूत्व घरातील चुल पेटवत तर त्यांचं हिंदुत्व घर पेटवतो.ह्द्यात राम ,हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे.हा फरक आमच्या व त्यांच्यात आहे.जाती धर्माच्या नावावर हे राजकारण करीत आहेत.त्यातूनच महाराष्ट्र अंधारात नेण्याच काम भाजपाने केले आहे. आता जनतेला हे सर्व समजले आहे.त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या या अंधारात मशाल पेटणार व परिवर्तन होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक आमदार नितेश राणेंवर टिका करताना ठाकरे म्हणाले, येथील आमदार लोकांना धमकावत आहे.लोकांच्या जमीनी लुटत आहे.आम्ही आता अशांची यादी बनवत आहोत.महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर यांना बर्फाच्या लादीवर झोपणार आहे.