
सावंतवाडी : सावंतवाडी मतदार संघ हा सुसंस्कृत लोकप्रतिनिधीचा मतदार संघ आहे. त्यामुळे या मतदार संघात चुकीच्या अपप्रवृत्तीना बिलकुल थारा देऊ नका, आपल्या मतदार संघातील हक्काचा माणसाच्या मागे खंभीरपणे उभे रहा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी केले. तर निवडणूक पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या स्फोटक पत्रकार परिषदेत त्यांच्या परस्पर निवडणूक रिंगणात असलेले माजी आमदार राजन तेली व भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब या दोघांवरही कमालीचे आक्रमक होत तोफ डागली.
बाउंसर वापरून टेंडर मॅनेज करणारी आणि एजंटगिरी करून कवडीमोलाने शेतकऱ्यांच्या जमिनी विकणारे आमदार आपल्याला चालतील का? असा थेट सवाल त्यांनी या पत्रकार परिषदेत उपसस्थित करत सावंतवाडी मतदार संघाला एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधीची परंपरा आहे. आणि ती आपल्याला कायम ठेवायची असल्याने कोणत्याही अपप्रवृत्तीना आपण थारा देणार नाही. ज्यांची जिथं जागा आहे तिथंच ते पोहचतील. कुणाला आमदार होऊन आपल्याला चुकीच्या कामांची जेल चुकू शकेल असं वाटतं असेल तर प्रसंगी गृहमंत्री सुद्धा तुरुंगात गेले आहेत हे त्या लोकांनी लक्षात घ्यावे असा इशाराच मंत्री केसरकर यांनी दिला आहे. या स्फोटक पत्रकार परिषदेत त्यांनी संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवार तेली व परब यांच्याबाबत जोरदार फटकेबाजी केली.
तत्पूर्वी शालेय शिक्षण व मराठी मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या राज्यस्तरीय कार्याची व आमदार म्हणून मतदार संघात केलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती दिली. शिक्षण विभागाच्या वतीने ३० हजार जागांची शिक्षक भरती, सरसकट सर्व मुलांना मोफत गणवेश, सर्व शाळासाठी सिंगल गणवेश योजना, मुलांच्या पाठ्यपुस्तकाचं कमी केलेलं ओझं, शाळामध्ये मुलांना अंडी, सॅलड, बिर्याणी, स्वीट डिश सारखा सकस पोषण आहार, मुलांसाठी आसलेल्या शिष्यवृत्ती योजेनेत भरघोस वाढ, माझी मुख्यमंत्री शाळा, महावाचन महोत्सव, आजी - आजोबा दिवस, सीबीएससी अभ्यासक्रम असणाऱ्या सुभाषचंद्र बोस शाळांची निर्मिती असे कधीही न, झालेलं अनेक उपक्रम आपण राबविलेत.
तर मराठी भाषा मंडळ माझ्याकडे आल्यानंतर त्या चारही मंडळाची सुसज्ज कार्यालये, मराठी भवन यां भव्य इमारत नरिमन पॉईंट येथे होऊ घातल्यात. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सातत्याने ते महाराष्ट्रात येतील त्या त्या वेळी पाठपुरावा केला. आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हि फार मोठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. साहित्यिकसाठी सुसज्ज इमारत, बालभावन इमारत, जवाहरलाल नेहरू बाल भवन नूतनीकरण, सायन्स पार्क, अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनसाठी २ कोटी अनुदान. मराठी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान असून मराठीला उत्तेजन देण्यासाठी मोठा उपक्रम राबवित मराठी भाषा विभागाचा कार्यभार यशस्वीपणे राबविल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रीयन मुलाना जर्मनीत नोकरी...
शासनाने केलेल्या करारानुसार येत्या काही वर्षात महाराष्ट्रातुन ४ लाख मुलांना जर्मनीत नोकरी मिळणार आहे. सिंधुदुर्गमधील ४०० मुलांचा त्यात समावेश असेल. इतकंच नव्हे तर जर्मनीत काम करणारी आपली मुले महिन्याला ३ लाख पगार घेऊ शकतात. संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम राबविला जातं असून १५ हजार मुकांना जर्मन भाषा शिकवली जात आहे.
आता फक्त कोकणची जबाबदारी घेणार...
माझ्याकडे राज्याचा मंत्री व मुंबई सारख्या बड्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद असल्यामुळे मतदार संघात मला सातत्याने येता आल नाही. याच सातत्याने मला दुःख आहे. मात्र येत्या काळात मी मुख्यमंत्री आणि सर्वच युतीतील वरिष्ठाना माझ्यावर फक्त कोकणची जबाबदारी द्या, मला माझ्या लोकांसाठी वेळ द्यायचा आहे. अशी विनंती करणार असल्याचे सांगितलं.
चांदा ते बांदा, सिंधुरत्न योजना मधून टसर प्रकल्प , हळद लागवड, हाऊस बोट, मच्छिमार बांधव यांना स्वतः च्या गाड्या, रापणकर संघाना जाळी, होड्याहि दिल्या गेल्या आहेत. भाताचे मोठे उत्पादन व्हावे यासाठी ग्रीन आर्मी ची निर्मिती. रंगीत व गोड्या पाण्यातील माशाची निर्मिती, काजूच्या रस काढणारी यंत्रणा,१५० जणांना स्वतःची हॉटेल, महिलांना अत्याधुनिक बसेस, तिलारीत एक कोटीची हाऊस बोट, आम्यूजमेंट पार्क उभारण्याचं टेंडर निघाल असल्याची माहिती त्यांनी दिली. नवा बाग फिशिंग व्हिलेज, सब मरीन प्रकल्पसाठी १०० कोटी, त्यातून समुद्र खालचं विश्व बघण्याचा प्रयत्न, आंबोली येथे १५० एकर मध्ये गोल्फ फोर्स, शिरोड्यातील ताज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना ६० कोटी अनुदान मिळवून दिल. इतकंच नव्हे तर महिला, युवक व शेतकरी यांच्यासाठी अनेक योजना राबविल्याचे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं स्वप्न होत हा पर्यटन जिल्हा जगात भारी असावा त्यासाठी आता आम्ही सांघिक काम करून हे स्वप्न पुर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. शेवटी महायुतीचा आमदार म्हणून निवडून आपण निवडून येणार. मला नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांचे आशीर्वाद असल्याचेहि ते म्हणाले.