
सावंतवाडी : आपल्या क्षमता ओळख क्षमतांची व मर्यादांची रास्त जाणीव म्हणजे आत्मविश्वास, सकारात्मक विचार करून आनंद मिळवा नकारात्मक विचार टाळा. चांगले मित्र निवडा व मैत्री विश्वासाने जपा.आज व्यसनाधीनता व वाईट गोष्टी मोठया प्रमाणात वाढताना दिसत आहेत त्यामुळे वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका. असे प्रतिपादन प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटील यांनी केले. कै.अच्युत रघुनाथ प्रभूतेंडोलकर बक्षिस योजनेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत हो यावेळी व्यासपीठावर या बक्षिस योजनेचे प्रणेते व झाराप गावचे प्रसिद्ध उद्योजक दिलीप प्रभू तेंडोलकर, देवेंद्र प्रभू तेंडोलकर, प्रभू तेंडोलकर परिवाराचे स्नेही श्री पारकर, संस्था अध्यक्ष प्रदीप प्रभू तेंडोलकर, संस्था सचिव मुकुंद धुरी, संस्था संचालक मोहन सावंत, बबन बोभाटे, प्रताप कुडाळकर, मुख्याध्यापक सलीम तकीलदार शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष वासुदेव मेस्त्री, शिक्षिका दीपा सावंत, संजय सामंत, उमेश प्रभुतेंडोलकर, प्रा. चव्हाण, पालक एकनाथ गवस, अशोक कोरगावकर, देऊ टिळवे, डिचोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.पाटकर यांनी या बक्षिस योजनेचे व बक्षिस पात्र विद्यार्थ्यांनचे कौतुक करतानाच सोशल मीडियाचा जपून वापर करा, शैक्षणिक बुद्धिमत्ते बरोबरच भावात्मक बुद्धिमतेचा विकास करा माणसातील देवपण ओळखा व प्रत्येकाशी सन्मानाने वागा असे या प्रसंगी आवाहन केले. चालू वर्ष हे या बक्षिस योजनेचे २४ वे वर्ष असून यावेळी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता ५ वी ते१२वी पर्यंत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमात वैष्णवी गवस,
लीना डिचोलकर, रुचिरा चव्हाण, भक्ती हळदणकर, भार्गवी गवस, पालक, अनिता हळदणकर, शिक्षक विद्यानंद पिळणकर एकनाथ कांबळे यांनी बक्षिस पात्र विद्यार्थ्यांनचे अभिनंदन केले व ही योजना खरोखरच विद्यार्थी व शिक्षक वर्गासाठी ऊर्जेचा स्तोत्र असल्याचे सांगितले. यावेळी संजय सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार यांनी प्रास्ताविक व परिचय करताना या योजनेचे फायदे विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षक एकनाथ कांबळे यांनी केले तर बक्षिस वाचन सहा. शिक्षक विद्यानंद पिळणकर यांनी तर आभार सहा. शिक्षक परशुराम नार्वेकर यांनी मानले.