वैयक्तिक स्वार्थापोटी 'अपशकुन नको' | तडजोड, पर्वा करणार नाही : नारायण राणे

उद्धव ठाकरेंवर तोडपाण्याचा गंभीर आरोप !
Edited by: विनायक गांवस
Published on: April 14, 2024 07:12 AM
views 746  views

सावंतवाडी : उद्धव ठाकरेंकडून कोकणातील प्रकल्पांना होणारा विरोध हा कोकणच्या प्रेमापोटी नाही तर तोडपाणी करण्यासाठी आहे असा आरोप नारायण राणेंनी केला. तर मी अशावेळी पक्षहीत, महायुतीच हीत बघतो. कुणाची पर्वा करत नाही. वैयक्तिक स्वार्थापोटी कुणी अपशकुन करू नये. त्यासाठी मी तडजोड करणार नाही, पर्वा करणार नाही. कालच मी ऐकलं आणि आज आलो असं विधान नारायण राणे यांनी राजन तेलींच्या 'हट्टापायी' स्टेटसवर केल. दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. 

मी सांगितलेल्या कामाला दीपक केसरकर कधी नाही म्हणत नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे, निवडणूक आहे  म्हणून हे मी सांगत नाही. तर उद्धव ठाकरेंकडून कोकणातील प्रकल्पांना होणारा विरोध हा कोकणच्या प्रेमापोटी नाही तर तोडपाणी करण्यासाठी आहे असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. तर विधानसभेत ठाकरेंना एडव्हान्स किती दिले ? याचा मी जाहीर आरोप केलाय असं ते म्हणाले. तर माजी आमदार राजन तेलींच्या 'हट्टापायी' स्टेटसवर ''नाराजी वगैरे मी बघत नाही. अशावेळी मी पक्षहीत, महायुतीच हीत बघतो. कुणाची पर्वा करत नाही. वैयक्तिक स्वार्थापोटी कुणी अपशकुन करू नये. त्यासाठी मी तडजोड करणार नाही, पर्वा करणार नाही. कुठल्याही कार्यकर्त्यांन अशा प्रकारचे ट्वीट वगैरे करू नये असं माझं स्पष्ट आहे. कालच मी ऐकलं आणि आज आलो. समक्ष जे भेटतील त्यांना हिसाबकिताबाबद्दल सांगेन.'' असं विधान नारायण राणे यांनी केल. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.