तब्बल 45 रक्तदात्यांचे रक्तदान !

तरंदळे खोतवाडीत रक्तदान व आरोग्य शिबीर
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 16, 2023 12:38 PM
views 178  views

कणकवली : श्री वशिक मर्यादा जागृत देवस्थान ट्रस्टच्यावतीने तरंदळे खोतवाडी येथे रक्तदान आणि आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले होते. रक्तदान शिबिरातून एकुण 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच कै. अनंत वामन परुळेकर यांच्या स्मरणार्थ डॉ. तेजसी परुळेकर ( त्वचारोग तज्ञ ) व डॉ. पियूष जाधव राजपूत ( अस्थिरोग तज्ञ ) यांच्या सहकार्याने गावातील ग्रामस्थांना त्वचेच्या व हाडांच्या आजारांवर मोफ़त मार्गदर्शन व उपचार मिळावे या उद्देशाने आरोग्य शिबीर आयोजीत केले होते. तरंदळे गावातील ग्रामस्थांचा या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
            

या कार्यक्रमाचा शुभारंभ दानशूर व्यक्ती काशिराम शिरसाट,डॉ.पियूष जाधव, डॉ.तेजसी परुळेकर, सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढीचे प्रमुख डॉ.राजेश पालव, कम्यूनिटी हेल्थ ऑफिसर डॉ. विद्या रासम ,तरंदळे सरपंच सुशील कदम, छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सावंत, ट्रस्टचे अध्यक्ष संतोष सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प तसेच मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.