देवगड : राजेंद्र हिंदळेकर यांच्या कडून देवगड एज्युकेशन बोर्डाच्या बाल विभागास १५ लाखाची देणगी देण्यात आली आहे. मिठबाव हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक श्री. राजेंद्र मोतीराम हिंदळेकर यांनी आपले चिरंजीव चित्रकार प्रथमेश राजेंद्र हिंदळेकर यांच्या स्मरणार्थ संस्थेला हि पंधरा लाख रूपयांची देणगी दिली आहे.
देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई संचालित मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक विभागाच्या बालविभागासाठी (किलबिल ते बालवर्ग)यासाठी ही देणगी दिली आहे.यावेळी बालविभागाच्या नामफलकाचे उदघाटन श्री. शंकर धुरी यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. के. एन. बोरफळकर यांनी . हिंदळेकर यांनी दिलेल्या देणगीचा सदुपयोग शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी केला जाईल, असे संस्थेच्या वतीने सांगितले. या प्रसंगी श्री. व सौ. हिंदळेकर यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीम. दीपा धुरी यांनी तर प्रास्ताविक शिंगाडे यांनी केले. या वेळी व्यासपीठावर देवगड एज्युकेशन बोर्डाचे संयुक्त कार्यवाह शंकर धुरी, पदाधिकारी प्रदीप आंबेरकर, रौप्य महोत्सव समितीचे अध्यक्ष सदानंद पवार, स्थानिक समितीचे अध्यक्ष डॉ. के. एन. बोरफळकर, उपाध्यक्षा अर्चना नेने, सचिव अविनाश माणगावकर, दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक निरंजन दीक्षित, खजिनदार द. म. जोशी तसेच स्थानिक समितीचे सदस्य मिलिंद कुबल,अनुश्री पारकर, चंद्रकांत शिंगाडे, डॉ. पुष्कर आपटे,विलास रुमडे,. दयानंद पाटील, वाडा लोकल कौन्सिलचे अध्यक्ष शांताराम पुजारे, मनोहर कानडे,. नारायण माने, अशोक लाड आदी उपस्थित होते.