डॉन बॉस्को हायस्कूलच्यावतीने प्रभात फेरी !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: January 30, 2024 12:44 PM
views 955  views

सिंधुदुर्गनगरी : ओरोस डॉन बोस्को हायस्कूल, ओरोस प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षक तर्फे संत डॉन बोस्को यांच्या जीवन चरित्रावर तसेच  त्यांनी गरीब, निराधार, बेघर व अशिक्षित मुलांसाठी केलेले शैक्षणिक, सामाजिक व सास्कृतिक कार्य तसेच संपादक, प्रकाशक इत्यादी  कार्य  सामाजातील लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता एक प्रभात-फेरी डॉन बोस्को हायस्कूल, ओरोस – सिंधुदुर्गनगरी- ओरोसफाटा   या परीसरात आयोजित केली होती.  

 संत डॉन बोस्को याची पुण्यतिथी दिनांक ३१  जानेवारी २०२४ रोजो संपूर्ण जगात साजरी होणार आहे. संत डॉन बॉस्को हे ख्रिचन धर्मगुरू होते येशूच्या सेवेच्या व बलिदानाच्या प्रेरणेने व त्याच्या आईने केलेल्या संस्कारांनी त्यांनी विशेषतः रस्त्यावरील अशिक्षित मुले, वाममार्गाला लागलेल्या व समाजाने वाळीत टाकलेल्या युवकांसाठी अतिशय मोलाचे कार्य केले. गोरगरीब युवकांना, मुलांना प्रेमाने व खेळाच्या माध्यमाने एकत्रित करून त्याच्यातील सुप्त गुण जाणून घेतले. कोणाला सुतार काम, कोणाला प्लंबर, कोणाला वेल्डर, मेकेनिकॅल अश्या विविध प्रकारे शिक्षण उपलब्ध करून तरुणांचा आधारस्थंभ झाला. त्यांनी सुरु केलेले महान कार्य आज जगात १४० देशात  पोचले.  आज एकूण सुमारे १७००० धर्मगुरू या संस्थेमध्ये सेवा देतात. संपूर्ण जगात सुमारे १०००० च्या वर संस्था स्थापन झाल्या असून त्यामध्ये असंख्य युवक युवती सर्व प्रकारचे शिक्षण व व्यवसाय शिक्षण घेतात.

या प्रभात फेरीमध्ये सुमारे 750 विद्यार्थी सहभाग झाले होते. या कार्यक्रमाद्वारे संत डॉन बोस्को यांनी अवलंबलेली विशेष शिक्षण पद्धत (Preventive Education System ) याची ओळख  तसेच भारतातील वेगवेगळ्या राज्यातील वेशभूषा व विविधता दर्शवणारे वेश परिधान करून व घोषणा देवून, हातात फलक घेवून  देशातील राष्ट्रीय एकात्मता,  सामाजिक,  सांस्कृतिक एकोप्याचे दर्शन  देण्यात आले.  ओरोस मधील संतोष वालावलकर मित्रमंडळातर्फे सुप्रिया वालावलकर यांनी प्रभात फेरीचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ दिला.