नूतन विद्यालय कळणेचा १०० टक्के निकाल

योगिनी धुरी प्रथम
Edited by: लवू परब
Published on: May 08, 2026 16:44 PM
views 57  views

दोडामार्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षा फेब्रुवारी 2026 चा निकाल नुकता जाहीर झाला असून नूतन विद्यालय कळनेचा 100% निकाल लागला.  

प्रथम धुरी योगिनी सुशांत 81.20% द्वितीय कळणेकर वेदांत धर्मराज 79.60% तर तृतीय चांदेकर प्राची शंकर 75.80% गुण मिळवून यश संपादन केले आहे.  प्रशालेत एकूण 17 विद्यार्थी बसले होते 17 पैकी 17 उत्तीर्ण झाले असून नूतन विद्यालय कळणेचा नाव उंचावले आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्थरातुन कौतुक केले जातं आहे.