दोडामार्गात उबाठाला मोठा धक्का

तालुकाप्रमुख श्रेयाली गवस शिंदेसेनेत | दीपक केसरकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
Edited by:
Published on: November 10, 2025 10:54 AM
views 419  views

दोडामार्ग : शिवसेना नेते व माजी शालेय शिशणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उबाठाच्या महिला तालुकाप्रमुख श्रेयाली गवस यांनी शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. आगामी जि. प. व पंचायत समिती निवडणूक तोंडावर आल्या असताना हा शिवसेना पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. 

यावेळी जिल्हा प्रमुख संजू परब, तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, उप जिल्हाप्रमुख राजू निंबाळकर, उपजिल्हाप्रमुख शैलेश दळवी, तालुका संघटक गोपाळ गवस, उप तालुकाप्रमुख तीलकांचन गवस, दादा देसाई, भगवान गवस, रामदास मेस्त्री, संदीप गवस, बबलू पांगम, बाळा नाईक, विनायक शेट्ये, विशांत तळवडेकर संजय गवस, सज्जन धाऊसकर आदि उपस्थीत होते. सावंतवाडी येथे हा पक्षप्रवेश झाला.