
दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील धाटवाडी परिसरात एक व्यक्ती झाडावरून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी १:१५ वा.च्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले व जखमीला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले.
शहरातील धाटवाडी येथे एक व्यक्ती तोल गेल्याने झाडावरून खाली पडली. तिला जाग्यावरून हलता येत नव्हते. परिणामी ती व्यक्ती तेथेच विव्हळत पडली होती. ही वार्ता ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांना समजताच उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, समन्वयक भिवा गवस यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. लगेच १०८ नंबर वर कॉल करून रुग्णवाहिकेला पाचारण केले. जखमी व्यक्तीला येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करून पुढील उपचारासाठी गोवा येथे पाठविण्यात आले आहे.










