
दोडामार्ग : दोमार्ग साटेली - भेडशी येथील प. पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज स्मारक मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावून आशीर्वादासह महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे काकड आरती आणि अभिषेकाने झाली. दिवसभर विविध भजन मंडळांची सुश्राव्य भजने झाली. यामध्ये भवानी सातेरी धारेश्वर, सातेरी महिला भजन मंडळ खानयाळे आणि सातेरी केळबाई महिला भजन मंडळ दोडामार्ग यांचा सहभाग होता. दुपारी महाआरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी भाऊ नाईक यांचे कीर्तन आणि श्री सातेरी लोककला मंच महिला ग्रुप तळेखोल यांचे समई नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री पालखी मिरवणूक सोहळा आणि कुडासे येथील माजी विद्यार्थी संघाचा 'गरुडझेप' - 'आग्र्याहून सुटका' हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग हे सोहळ्याचे मुख्य आकर्षण आहे.
सदगुरू राऊळ महाराज संस्थान, पिंगुळीचे कार्याध्यक्ष विठोबा विनायक (अण्णा) राऊळ आणि समस्त विश्वस्त मंडळाने रात्रीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.










