विजघर इथं अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

८ लाखांचा मुद्देमाल जप्त
Edited by:
Published on: October 10, 2025 20:21 PM
views 161  views

दोडामार्ग : विजघर येथे गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल ८ लाख ८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत बिरू लखू लांबर व बाबू धाकलू लांबर यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली आहे.

घाटमाथ्यावरून दररोज असंख्य गाड्या दर दिवशी सायंकाळ व रात्रीच्या सुमारास ब्राॅयलर कोंबड्या घेऊन तिलारी घाट मार्गे गोव्याला जात असतात. सर्व कोंबड्या विक्री करून दुसऱ्या दिवशी पहाटे अथवा सकाळच्या सुमारास माघारी जातात. अशीच एक गाडी शुक्रवारी सकाळच्या सुमारास माघारी जात असताना विजघर येथील तपासणी नाक्यावर पोलिसांनी ती तपासणीसाठी थांबवली. गाडीच्या केबिनमध्ये गोवा बनावटीची अवैध दारू पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी ती गाडी येथील पोलीस ठाण्यात आणली व ८ लाख रुपये किमतीच्या गाडीसह ८ हजार १०० रुपयांची दारू जप्त केली. तसेच संशयित बिरू लखू लांबर व बाबू धाकलू लांबर यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विजय जाधव, श्री साटेलकर यांनी ही कारवाई केली.