मटका प्रकरणी दोडामार्ग पोलिसांची एकावर कारवाई

Edited by: लवू परब
Published on: September 12, 2025 15:46 PM
views 298  views

दोडामार्ग : साटेली - भेडशी येथे कल्याण मटक्याचा जुगार खेळवत असलेल्या एका इसमावर दोडामार्ग पोलिसांनी कारवाई केली. अजय अनंत शिरोडकर (३९, रा. साटेली-भेडशी ) असे संशयिताचे नाव आहे. तो गुरूवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास साटेली - भेडशी येथे सार्वजनिक ठिकाणी कल्याण मटक्याचे आकडे घेऊन पैसे स्वीकारून जुगार खेळवताना पोलिसांना आढळून आला. यावेळी त्याच्याकडून रोख रक्कम १३२० रुपये व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी महा. जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ मधील कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.