
दोडामार्ग : साटेली भेडशी ग्रामस्थांचे सुरू असलेले आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या यशस्वी शिष्टाई नंतर आंदोलन कर्त्यांच्या मागणीनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) यांनी ग्रामपंचायतला दिलेला आदेश रद्द करीत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर (भा.प्र.से.) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, यांचे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना दळवी यांच्याहस्ते देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे देण्यात आले.
तीन महिन्यांपूर्वी साटेली-भेडशी ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) जि. प. सिंधुदुर्ग यांनी पत्राद्वारे ग्रामसभेने घेतलेला निर्णय, ग्रामपंचायतीने घेतलेला ठराव हा अधिकाराचे सरळ उल्लंघन आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला व्यक्तीच्या व्यवसायावर बंदी घालण्याचा अधिकार नाही. त्यामुळे हा ग्रामसभेचा निर्णय रद्द करावा, असे कळविले या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले होते ते बुधवारी तिसऱ्या दिवशीही मागे घेण्यात आले.
तीन महिन्यांपूर्वी साटेली-भेडशी येवील एका इमारतीत दोन तलवारी सापडल्याची घटना निदर्शनास आली होती. त्यानंतर ही इमारतही जमीनदोस्त करण्यात आली तसेच यात सहभागी असलेल्या दोषींवर कारवाई करीत त्यांचे साटेली-भेडशी कार्यक्षेत्रात असलेले उद्योग- व्यवसाय बंद करावेत, असा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. मात्र, असे असतानाही त्यांचे उद्योग-व्यवसाय सुरूच असल्याने पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ग्रामसमेत ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरत जोपर्यंत संबंधित व्यावसायिकांना नोटीस बजावून कायमस्वरुपी दुकाने बंद करावीत, असा ठराव होत नाही तोपर्यंत हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत तब्बल आठ तास ग्रामसभा चालली होती अखेर संबंधिताना व त्यांच्या आस्थापनांना व राहत्या घरी नोटीस देण्यात आली आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले होते.
ज्या संबंधितांना नोटीस काढली होती, त्यांनी या ठरावाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी,जि प सिंधुदुर्ग यांच्याकडे दाद मागल्यानंतर उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला गटविकास अधिकाऱ्यांद्वारे कळयले, ग्रा. पं. ने घेतलेला ठराव भारतीय घटना कलम २१ चे उल्लंघन करत आहे. त्यामुळे त्याची अंमलबाजावणी स्थागित करण्याची सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आली. त्यानंतर ही बाब ग्रामस्थांना कळल्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात एकवटले व ग्रामसमेने घेतलेला ठराव कुठल्याही परिस्थितीत रद्द करू नये यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सोमवार पासून सुरू असलेले आंदोलन बुधवारी तिसऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या यशस्वी शिष्टाई नंतर आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) यांनी ग्रामपंचायतला दिलेला आदेश रद्द करीत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर (भा.प्र.से.)जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, यांचे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना श्री. दळवी यांच्याहस्ते देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे देण्यात आले.
नवीन आदेशात काय म्हटले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर (भा.प्र.से.)जिल्हा परिषद सिंधुदुर्ग,यांनी ग्रामपंचायत साटेली- भेडशी सरपंच/ग्रामपंचायत अधिकारी यांना दिलेल्या लेखी पत्रात आता संदर्भ क्र.०४ अन्वये प्राप्त अहवालाचे अवलोकन करता, तसेच सदर प्रकरणी सद्यस्थितीची माहिती व नासीक सभा दिनांक २३/०६/२०२५ ठराव क्र.१२(२) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ८(२) अन्वये ग्रामसभेत दिलेल्या सुचना ग्रामपंचायतीने (मासीक सभेने) स्विकारल्याच पाहिजेत असे पंचायतीवर बंधन घालण्यात आलेले नाही, अशी तरतुद असल्याने या कार्यालयाकडील संदर्भ क्र.०२ अन्वये दिलेले पत्र रद्द समजण्यात यावे व आपण यापुढे महाराष्ट्र ग्रामंपचायत अधिनियमातील तरतुदी व शासनाकडुन वेळोवेळी दिलेले निर्देश यांचे पालन करुन ग्रामपंचायतीचा कारभार करावा. असे म्हणण्यात आले आहे.










