
दोडामार्ग : मला अपेक्षित नव्हत की कृषी विभागाच्या रानभाजी महोत्सवात एवढ्या रानभाज्या पहायला मिळतील, खरच कृषी विभागाचा स्तुत्य असा उपक्रम आहे. जे पूर्वज म्हणायचे पुराण आयुर्वेदिक ज्या रान भाज्या आहेत त्या आपल्या आरोग्याला महत्वाच्या आहेत या रानभाजी चे महत्व जाणून दिले त्यांना मी शुभेच्छा देते व रान भाजयचे महत्व सर्वान पर्यंत पोहचवा असे प्रभारी तसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी सांगितले.
कृषी विभाग व आत्मा यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित रानभाजी महोत्सव तहसील कार्यालय येथील हॉल मध्ये रानभाजी महोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्यासोबत व्यासपीठावर फळबाग अध्यक्ष संजय देसाई, आत्मा समिती सदस्य राकेश धरणे, विनिता देसाई, चेतना गडेकर, प्रमुख मार्गदर्शक राजेश शोँगारे, चंद्रशेखर सावंत, पत्रकार लवू परब, सुमित दळवी, तुळशीदास नाईक, शिरीष नाईक तालुक्यातील शेतकरी, कृषी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक राजेश शोँगारे म्हणाले की जो दगडातला खाता तो दगडा सारखो असता प्रत्येक फळ, फुल, भाजी यांच आपल्या आरोग्याशी काय महत्व आहे हे त्यांनी पटवून दिले. तसेच बाजारी भाजी पेक्षा फासफूड पेक्षा रानभाजी आपल्या जीवाला महत्वाची आहे असं त्यांनी सांगितले. त्यामुळे आपले आरोग्य जपायचे असेल तर रानभाजी खा असे त्यांनी आवाहन ही केले.