दोडामार्ग तहसीलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

Edited by: लवू परब
Published on: August 19, 2025 11:31 AM
views 90  views

दोडामार्ग : नुकत्याच पार पडलेल्या महसूल दिनाला उत्कृष्ठ अधिकारी म्हणून पुरस्कार मिळालेल्या दोडामार्ग प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी ७९ वा स्वातंत्र्य दिन दोडामार्ग तहसील कार्यालयात भव्य उत्साहात साजरा केला. या विशेष प्रसंगी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी उपस्थितांना संबोधित करत मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणात त्यांनी देशभक्ती, एकता आणि सामाजिक जबाबदारीवर विशेष जोर दिला. 

यावेळी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या अनोख्या कलागुणांचीही प्रात्यक्षिके दिली. विद्यार्थ्यांनी देशाभिमान वाढविणारी भाषणे आणि छोटी छोटी नाटके सादर करून उपस्थितांच्या मनाला आकर्षित केले. या सुस्वाक्षरेत युवा पीढीच्या उत्साहाची आणि राष्ट्रनिर्माणामध्ये त्यांच्या सहभागाची महत्त्वाची झलक पहायला मिळाली. स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन 'जय हिंद' वंदे मातरम्, भारत माता की जय अशा च्या जयघोषाने तहसील परिसर दणाणून सोडला होता. यावेळी प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने, मंडळ अधिकारी प्रकाश पास्ते, शरद शिरसाट, सहाय्यक महसूल अधिकारी एस. आर. गवस, मनीषा कोचरेकर, पी. एम. म्हाडगुत, श्री. पोकरणकर, अर्जुन पाठमोरे, अशोक कदम, ऊत्कर्षा ठाकूर, करुणा कदम, तलाठी पी. ए. गायकवाड आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.