
दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या कचरा घंटा गाडीतून कचरा डेपोत कचऱ्या बरोबर गेलेले दीड लाखाचे मंगळसूत्र स्वछता कर्मचारी प्रताप राऊळ, व सुनील आरोसकर यांनी शोधून दिल्याने सावंतवाडा येहे राहणाऱ्या सोनाली आपा देसाई यांनी नगरपंचायतने आभार मानले.
कसई दोडामार्ग नगरपंचायतची कचरा घंटा गाडी शहरातील सावंतवाडा येथे कचरा घेण्यासाठी गेली होती. सावंतवाडा येथे भाड्याच्या रूममध्ये राहणारे सोनाली आपा देसाई यांनी नेहमी प्रमाणे घरातील कचरा भरून तो आलेल्या घंटा गाडीत टाकला. ती आपल्या रूम वर गेली काही वेळाने तिच्या गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे सोनाली हिला लक्षात आले. तिने घरात सर्वत्र मंगळसूत्र शोधले तरी तिला सापडले नाही. अंदाजे कचऱ्यातून ते कचरा गाडीत गेले असावे असा त्यांनी अंदाज वर्तवून, तिचा नवरा प्रताप देसाई यांनी सावंतवाडा येथील राहिवाशी उली नाईक यांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर नाईक यांनी लगेच घंटा गाडी चालकाला फोन केला व तात्काळ कचरा डेपोत गेले. त्यानंतर स्वछता कर्मचाऱ्यांनी कचरा डेपोत टाकलेल्या कचऱ्यात शोध घेतला त्यावेळी कचऱ्यात मंगळसूत्र आढळून आले. यावेळी सफाई कर्मचारी प्रताप राऊळ,व अनिल आरोसकर यांनी मंगळसूत्र सोनाली देसाई हिला परत केले.