
दोडामार्ग : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत कॅन्सर तपासणी व जनजागृती मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु केली आहे. कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन सिंधुदुर्ग मध्ये दाखल झाली गुरुवारी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालंय येथे ही व्हॅन दाखल होऊन २५७ रुग्णांची तपासणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातून या व्हॅन ने तपासणी सुरवात केली आहे. गुरुवार २३ जुलै रोजी सदरची व्हॅन ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे दाखल झाली यावेळी या व्हॅनचे सर्व प्रथम उदघाटन तालुक्यातील राजकीय पुढऱ्यांच्या हस्ते करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहीम सुरू केली आहे. यात कॅन्सर तपासणी सुविधा असलेली सुसज्ज कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन तेथील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या व्हॅन मध्ये तन्य डॉक्टर मार्फत सर्व सुविधा उपलब्ध होती. यावेळी ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे डायग्नोस्टिक कॅन्सर व्हॅन च्या सहाय्याने व तन्य डॉक्टर यांच्या मार्फत पुरुषांची ओरल व महिलांची ओरल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, तसेच cervical कॅन्सर तपासणी करण्यात आली. यावेळी सदर कार्यक्रमास उद्घाटन प्रसंगी नगरध्यक्ष चेतन चव्हाण, उबाठा जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, मा. डॉ नित्यानंद मसुरकर वैद्यकीय अधिक्षक डॉ आकाश एडके, डॉ रामदास रेडकर, डॉ मेघा अंधारी तालुका आरोग्य अधिकारी,डॉ शैलेश वारवटकर, डॉ क्रांती बारस्कर, डॉ समिर धाकुरकर दंत चिकित्सक, डॉ विष्णू नाईक, डॉ पुष्पलता मानेरीकर, संतोष खानविलकर, सर्व अधिपरिचारिका, तसेच अजित सावंत, कर्मळकर, राजेश वाघाटे, तुळसकर तसेच सर्व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तसेच तालुका आरोग्य कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,तसेच अंगणवाडी सेविका, आशा ताई तसेच सर्व पत्रकार बंधू तुळशीदास नाईक, लवु परब, दिपक गवस व भुषण सावंत पत्रकार बंधू उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना सचिन मोहिते एन सी डी समुपदेशक यांनी केले. सूत्रसंचालन डॉ रामदास रेडकर यांनी केले.