उपसरपंचपदी निवड ; शिवसेनेकडून मायकल लोबो यांचा सत्कार

Edited by:
Published on: July 13, 2025 17:37 PM
views 133  views

दोडामार्ग : तेरवण - मेढे उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल दोडामार्ग शिवसेना कार्यालयात मायकल लोबो यांचा  शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस,  हेवाळे गावचे माजी उपसरपंच समिर देसाई, महीला तालुकाप्रमुख सौ. चेतना गडेकर उपजिल्हाप्रमुख सौ. मनिषा गवस  सचिव अमरसिंग राणे, सौ. गावडे   व ईतर शिवसैनिक उपस्थित होते. मायकल लोबो हे धडाडीचे कार्यकर्ते असून त्यांची वर्णी गावच्या उपसरपंच पदी लागल्याने तेथील विकास कामाना गती मिळेल अशी अपेक्षा लोबो यांच्या सहकारी वर्गातून होतं आहे.