
दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायतने गुरुवारी दोडामार्ग शहरातील व्यापाऱ्यांवर फिरत्या पथकाने १० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून ८०० रु. दंडात्मक कारवाई करून मुद्देमाल ताब्यात घेतला.
गेल्या काही महिन्यापासुन कसई दोडामार्ग शहर प्लास्टिक मुक्त होण्यासाठी नगरपंचायतने प्लास्टिक पिशवी किंवा वस्तू वापरणाऱ्यावर विकणाऱ्यावर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. आणि व्यापारी व नागरिकांना आवाहनही केले आहे की प्लास्टिक पिशवी वस्तू वापरून नको विकू नका. असे असताना देखील काही व्यापरी व नागरिक अजूनही प्लास्टिक पिशवीचा वापर करत आहेत. मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली गुरुवारी दुपारी नगरपंचायतच्या फिरत्या पथकाने शहरातील भाजी व्यापाऱ्यांवर प्लास्टिक पिशवी बाळगल्या प्रकरणी दांडात्मक कारवाई केली यावेळी संजय शिरोडकर, निवेद कांबळे, सिद्धेश शेगले, सूर्यनरायण गवस, अंकुश कदम, प्रणाली शेटकर, यांनी ही कारवाई केली.
दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील सर्व व्यापरी व नागरिकांनी प्लास्टिक वापरणे बंद करा असे पुन्हा नगरपंचायत कडून आवाहन करण्यात आले आहे. आणि यापुढे जर कोणी प्लास्टिक वापरताना किंवा विकताना आढळल्यास डात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
फोटो :- प्लास्टिक पिशवी बाळगल्या प्रकरणी कारवाई करताना नगरपंचायतचे फिरते पथक.