
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याच्या विकासात सरपंच यांची भूमिका महत्वाची असून त्यांच्या कार्यकतृत्वाच्या जोरावर गावापासून विकासाची प्रक्रिया सुरु झाली आहे, त्यामुळेच तालुक्याचा विकास हा जलद गतीने होतं आहे, या तालुका विकासाचे कर्णधार सरपंच असल्याचे वक्तव्य सावंतवाडी मतदार संघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दोडामार्ग येथे केले. दोडामार्ग तालुका वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील डिजिटल मीडिया समूहाने आयोजित केलेल्या "सरपंच सत्कार सोहळ्यात" ते बोलत होते.
व्यासपीठावर आमदार दिपक केसरकर यांसह जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक गवस,शिवसेना उप जिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर, सावंतवाडी शिवसेना मतदार संघ प्रमुख प्रेमानंद देसाई,सरपंच सेवा जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस,भाजपा महिला तालुकाप्रमुख दिक्षा महालकर, शिवसेना महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, दोडामार्ग तालुका सरपंच सेवा संघटना तालुकाध्यक्ष अनिल शेटकर, उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख संजय गवस, कसई दोडामार्ग नगरपंचायत विषय समिती सभापती संध्या प्रसादी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मानिष दळवी यांनीही उपस्थित सरपंच यांना संबोधित करताना गावाच्या विकासात आपले योगदान महत्वाचे असून यासाठी जिल्हा बॅंक तसेच पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायणराव राणे यांच्या माध्यमातून लागेल ती मदत करायला तयार असल्याचे मनीष दळवी म्हणाले. या कार्यक्रमातून मीडिया आणि सरपंच यांचा योग्य समन्वय साधला जातं असून लोकप्रतिनिधिना जोडण्याचे हे योग्य माध्यम असल्याचे मनीष दळवी म्हणाले.
उपस्थित सरपंच यांचा खास सत्कार यावेळी करण्यात आला. तर डिजिटल मीडिया ला वेळोवेळी सहकार्य करणारे उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी यांचाही स्वागत व सत्कार सोहळा यावेळी तालुक्यातील डीजिटलं मीडिया प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमोद गवस, आपा राणे, प्रथमेश गवस, गोविंद शिरसाट व प्रतीक राणे यांनी विशेष मेहनत घेतली.