
दोडामार्ग : तालुक्यातील कोलझर ग्रामपंचायतच्या सरपंच सुजल सूर्यकांत गवस यांनी चक्क आपल्या पदाच्या मानधनातून समाजसेवा हायस्कूल कोलझरच्या मुलांना शैक्षणिक साहित्य व ड्रेस देण्याचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या त्यांच्या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
गावचा सरपंच म्हटला की विकास, योजना यावरच जास्त भर असतो. मात्र दोडामार्ग कोलझर गावच्या सरपंचा सुजल गवस यांनी गावच्या विकासा बरोबर आपल्या गावातील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य, शालेय ड्रेस यासारख्या वस्तू देण्याचे संकल्प हाती घेतला गुरुवारी समाजसेवा हायस्कूल कोलझर येथे मुलांना वह्या वाटप करून गरजू मुलांना शालेय ड्रेस वाटप केले. यावेळी सरपंच सेजल गवस यांच्या सोबत पी पी देसाई, शामराव देसाई, आपा देसाई, चंद्रकांत दळवी, रामचंद्र देसाई, सुभाष बोद्रे, विकास सावंत, सूर्यकांत गवस, प्रिया देसाई, मुख्यध्यापक राठोड आदी उपस्थित होते.