हळबे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Edited by:
Published on: June 22, 2025 12:05 PM
views 51  views

दोडामार्ग : लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक, मानसिक स्वस्तासाठी  आणि निरोगी व आनंदमय जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्त्वाचा आहे असे मत नर्मदा पटेल यांनी आपल्या व्याख्यानातून मांडले. यावेळी तिने योगाची विविध प्रात्यक्षिके दाखविली.

प्राचार्य डॉक्टर सुभाष सावंत यांनी मन चंचल आहे जे वैरी न चिंती ते मन चिंती त्यामुळे चंचल मनाला आपले ताब्यात ठेवण्यासाठी योगा अत्यंत महत्त्वाचा आहे चांगले विचार चांगले आरोग्य आपल्या मनाला सुदृढ ठेवू शकते असे त्यांनी सांगितलं. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष सावंत, योगा शिक्षिका नर्मदा पटेल,  इंगळे मॅडम, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर संजय खडपकर, महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक डॉक्टर संजय खडपकर तर आभार डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे यांनी मानले.