अरे बापरे...पर्यायी रस्ताच गेला वाहून

Edited by: लवू परब
Published on: June 16, 2025 11:33 AM
views 494  views

दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी मार्गावर तिलारी नगर येथे भर पावसात कॉजवेचे काम सुरु होते. रात्री पासून पडणाऱ्या धोधो पावसामुळे ठेकेदाराने काढलेला पर्यायी रस्ताच वाहून गेल्याने वाहन चालकांचे मोठे हाल झाले आहेत. तारेवरची कसरत करून दुचाकी चालविताना  एका दुचाकी स्वराचा अपघात झाला आहे. 

मुसळधार पडणाऱ्या पावसाने दोडामार्ग तालुक्याला चांगलेच  झोडपून काढले आहे. काल रविवारी पडणाऱ्या मुसळधार पावसाने दोडामार्ग तिलारी मार्गावरील तिलारी नगर येथे एका कॉजवेचे काम सुरु होते. त्यासाठी पर्यायी काढलेल्या रस्त्यावर नाल्याचे पाणी आल्याने रस्ताच वाहून गेला आहे. ही घटना सकाळी  प्रवाशांच्या निदर्शनास आली. त्यावेळी तिलारी माऊली हेल्पलाईन व्हाटसप ग्रुपवर याची माहिती टाकून सर्व तालुका वासीय व घाट वासीयांना सूचित करण्यात आले. यावेळी घाट माथ्यावर जाणाऱ्या व दोडामार्ग गोवा ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांनी ठेकेदाराच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. दुचाकी चालवीताना काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आलय.