दोडामार्गातलं ज्वेलर्सचं दुकान फोडलं

दागिने लंपास
Edited by: लवू परब
Published on: June 15, 2025 13:41 PM
views 171  views

दोडामार्ग : दोडामार्ग बँक ऑफ इंडिया बँक समोरील काल भैरव ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात शनिवारी मध्यरात्री चोरट्यानी दुकान फोडून दागिने लंपास करण्याचा प्रयन्त केला. सदर घटना दुखकानाच्या सीसी टीव्ही मध्ये कैद झाली असून तीन चोरटे असल्याचे सांगण्यात येत आहेत. मात्र दुकानाचे कुलूप उघडले नसल्याने चोरीचा डाव फसला. याबाबत दोडामार्ग पोलिस  घेतानास्थळी जाऊन तपास करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशिकी शनिवारी मध्यरात्री म्हणजे दीड वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ इंडिया बँक समोरील काल भैरव ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात अज्ञात चोरट्यानी दुकान फोडून दागिने पळवण्यासाठी आले होते मात्र चोरट्याना दुकानाचे कुलुप उघडले नसल्याने चोरीचा डाव फसला. सदर चोरी करणारे अज्ञता चोरटे सीसी टीव्हीत कैद झाले आहेत. सदर चोरीची घटना दुकान मालकाने दोडामार्ग पोलिसांना सांगितली. त्यानंतर दोडामार्ग पोलीस घटना स्थळी येऊन तपास केला. पुढील कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.