
दोडामार्ग : मान्सून पूर्व पडलेल्या अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्यातील विजेचा प्रश्न चव्हाट्यावर आणला आहे. गेल्या ८ दीवसांपासुन दोडामार्ग शहरासह तालुक्यातील इतर गावात विजेचा लपंडाव सुरु आहे. काम जमत नसेल तर घरी चला खुर्चा गरम करण्याची काही गरज नाही. वारंवार वीज कां जाते? वरिष्ठ अधिकारी फोन का घेत नाही? साटेली भेडशी येथील चव्हाण यांना उद्या दोडामार्ग ऑफिसला बोलवा सर्वांचाच उद्या गृहपाट घ्यायचा आहे असे सांगत अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी फैलावर घेत २ तास घेराव घातला.
गेल्या आठ दिवसापासुन सुरु झालेल्या अवकाळी पावसाने दोडामार्ग तालूक्यात विजेच्या प्रश्नावरून हाहा कार माजवीला दोडामार्ग शहरासह इतर गावांत लाईट गुल झाली आहे. पाणी, मोबाईल, सरकारी कामकाज, विद्युत उपकरणे आदी पासून नागरिक हैराण झाले आहेत. या सर्व गोष्टी पासून हैराण झालेल्या संपत नागरिकांनी दोडामार्ग विजवितरण च्या कार्यालयात धडक दिली. आणि पावसाळ्यात वीज जाणार नाही, लाईनवरील झाडे झूडपे कट करण्यात येईल अशी आश्वसने देणाऱ्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी फैलावर घेतले. वारंवार लाईट का जाते? लाईट गेल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क केला असता तें फोन का घेत नाही? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करत उपस्थिती अधिकाऱ्यांना नागरिकांनी चागलेच फैलावर घेतले. यावेळी कसई दोडामार्ग नागराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, पाराषर सावंत, सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, खोकरल सरपंच देवेंद्र शेटकऱ, पाल उपसरपंच राजन गवस, यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.