
दोडामार्ग : साटेली भेडशी थोरले भरड येथे बेकायदेशीर शस्त्र वापरून मकतब चालवली जाणारी अनधिकृत इमारत अखेर आज सोमवारी पहाटे कडेकोट पोलीस बंदोबस्तात जमीन दोस्त केली. अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी खंबीर सहकार्य केल्याने त्यांचे आभार मानले आहेत. या धडक ॲक्शन मुळे हिंदू बांधवात एकच आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले. तर या साटेली भेडशी येथील स्थानिक नागरिकांनीही या बेकायदा इमारत व केल्या जाणाऱ्या कृत्यावर वेळीच ठोस कारवाई झाल्याने सर्वांचे आभार मानले आहेत.
साटेली भेडशी थोरले भरड येथे एका अनधिकृत बांधकाम केलेल्या घरात काही दिवसांपासुन शस्त्र प्रशिक्षण व मकतब चालवून सात ते दहा वयोगटातील मुलांना उर्दू अरबीचे शिक्षण दिले जात असल्याचे समजताच हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी हा प्रकार दोडामार्ग पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्या नुसार पोलीस निरीक्षक हेमचंद खोपडे व अन्य सहकाऱ्यांनी कायदेशीर रित्या त्या घराची झडती घेतली. या झडतीत त्या घरात अवैधरित्या ठेवलेल्या तलावारी मिळाल्या. तसेच घरात मकतब चालवून सात ते दहा वयोगटातील मुलांना उर्दू व अरबीचे शिक्षण देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्या ठिकाणी उपस्थित असलम इस्माईल खेडेकर, व बिलाल आलम शेख या दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला होता. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व हिंदुत्ववादी संघटना व अन्य नागरिक दोडामार्ग तहसील कार्यालय येथे ठिय्या मांडून बसले होते. तसेच ती अनधिकृत इमारत पाडून त्या संघटनेचे अध्यक्ष आहे त्याला अटक करून कारवाई करा अशी जोरदार मागणी केली होती. ती अनधिकृत इमारत पोलिसांनी सील करून ताब्यात घेतली. तब्बल ८ दिवसांच्या कालवधीनंतर सदरची अनधिकृत इमारत पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुत्ववादी संघटना व स्थानिक प्रशासन यांच्या उपस्थितीत सोमवारी पहाटे पाडण्यात आली.
अनधिकृत इमारतीत बेकायदेशीरपणे मदरसा चालवत असल्याचा आरोप दोडामार्ग मधील हिंदुत्ववादी संघटनेने केला होता. सदरची इमारत बांधण्यासाठी ग्रामपंचायतची कुठलीच परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे ती अनधिकृत इमारत म्हणून ग्रामपंचायतने जाहीर केले होते. तब्बल ८ दिवसांच्या कालवधीनंतर अखेर ती अनधिकृत इमारत सोमवारी ०५ मे रोजी पहाटे कडक पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली.
साटेली भेडशी थोरले भरड येथे ग्रामपंचायतची कुठलीही परमिशन न घेता १२ वर्षापूर्वी अनधिकृत इमारत उभी केली होती. ती इमारत एका संस्थेला भाडे तत्वावर दिली होती. ज्याने ही भाडे तत्वावर घेतली त्याने त्याठीकाणी उर्दू व अरबीचे शिक्षण देण्यास सुरवात केली. या शिक्षणात तलवार चालविण्याचे शिक्षण दिले जात असल्याचे व काही तरी अनुचित प्रकार याठीकाणी होत असल्याचं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणन होत. 'त्या' अनधिकृत इमारतीमध्ये साधारण ३ वर्षापासून उर्दू व अरबीचे शिक्षण व तलवार चालवीण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे स्थानिक नागरिकांमधून आता बोले जात आहे.