
दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीत शनिवारी पंचशील नगर येथे गोवा येथील तसेच काही स्थानिक महिला कडून सभा आयोजित करून जो काही धर्मांतर सारखा प्रकार घडला या घटनेशी साटेली भेडशी चर्च वा स्थानिक कौन्सिल ख्रिस्ती बांधव यांचा काही संबंध नाही. घडलेल्या घटनेचा आपण जाहीर निषेध करतो अशी जाहीर भूमिका दोडामार्ग तालुक्यातील ख्रिस्ती समाज बांधवानी जाहीर केली आहे. समाज बांधव मार्शल फर्नांडेस, एडवीन फर्नांडिस, शिला फर्नांडिस, मायकल लोबो, मार्शल लोबो, आमरोस फर्नांडिस, फिलिप फर्नांडिस, जेनीफर लोबो आणि युवक, युवती यावेळी उपस्थित होते.
साटेली भेडशी चर्ज येथे हि जाहीर भूमिका ख्रिस्ती बांधवानी मांडली आहे. दोडामार्ग पंचशील नगर येथे शनिवारी दुपारी काही महिला बायबल पुराण ग्रंथ घेऊन या धर्माचा प्रसार तसेच धर्मांतर सारखा प्रकार करण्यासाठी सभा आयोजित केली होती. याची चाहुल लागताच दोडामार्ग येथील हिंदू युवकांनी तो कार्यक्रम उधळून लावून सदर महिला याना दोडामार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग येथे घडलेल्या घटनेच्या साटेली भेडशी या भागातील स्थानिक ख्रिस्ती बांधवानी साटेली भेडशी चर्च येथे बैठक घेऊन घडलेल्या घटनेचा निषेध केला. त्या घटनेशी ख्रिस्ती धर्म बांधवाचा काही संबंध नाही. साटेली भेडशी भागात ख्रिस्ती समाज बांधव शेकडो वर्षांपासून आहेत. सर्व समाज बांधव व मंडळी यांच्या सोबत चांगले संबंध असून समाज बांधव सामाजिक सलोख्याने वाटचाल करत आहेत. त्यामुळे आमचा कोणाचाही त्या घटनेशी संबंध नाही असे जाहीर रित्या स्पष्ट केलं आहे.