
दोडामार्ग : शिरंगे धरणाच्या जलाशयाला लागून काही काळ्या दगडच्या खाणी सुरू आहेत. अनेकांच्या जमीनीत दगड माती टाकून नुकसान केले जात आहे. तहसीलदार कार्यालय येथे तक्रार करून देखील संबंधित यंत्रणा संबंधित खाण धारकांची बाजू घेतात हे प्रकार घडत आहेत. शिरंगे गावातील धरणग्रस्त दिलीप विश्राम गवस, यांच्या जमनीतील काजू झाडे इतर झाडे याचे नुकसान होत आहे. जमीनीत घुसखोरी केली आहे. या बाबत तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही त्यामुळे दिलीप गवस यांनी २६ जानेवारी रोजी दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शिरंगे गावात माझी वडिलोपार्जित जमीन आहे. या ठिकाणी काजू झाडे इतर झाडे आहेत. शिवाय बुडीत क्षेञाच्या बाहेर आहे. सन २०१४ मध्ये नवीन काजू झाडे लागवड केली आहेत. या जमीनीला लागून मोठ्या प्रमाणात नियम धाब्यावर बसवून खडी उत्खनन केले जात आहे. यातील दगड माती टाकून अनेक काजू झाडे मातीखाली गाडली गेली आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले. शिवाय आपल्या जमिनीत चर खोदला होता तो बुजवून रस्ता खडी वाहतूक करण्यासाठी केला आहे. या ठिकाणी नुकसान होत आहे. या बाबत दोडामार्ग तहसीलदार कार्यालय मंडळ अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही. अतिक्रमण करून काळा दगड उत्खनन केले जात आहे. हे दिलीप गवस यांनी दाखवून दिले.
बेकायदेशीर नियमबाह्य झिलेटीन स्फोट केले जातात ते दगड जमीनीत पडतात तक्रार केली की नुकसान भरपाई देतो असे सांगून दिशाभूल केली जात आहे. वेळ मारून नेली जाते आजपर्यंत एकरूपया ही नुकसान भरपाई दिली नाही. महसूल यंत्रणा संबधिताना पाठीशी घालत आहेत.
माझ्या जमीनीत अतिक्रमण करून उत्खनन केले जाते माती ढिगारे टाकून काजू झाडे गाढली की नाही हे पाहाण्यासाठी शुक्रवारी दोडामार्ग तहसीलदार अमोल पवार यांनी काही महसूल कर्मचारी यांना पाठवले. पण ते कर्मचारी संबंधित दगड खाण धारकांच्या गाडीतून घटनास्थळी गेले. आणि दिलीप गवस याच्यावर जबरदस्तीने आपली काही तक्रार नाही असा दबाव आणून जबाब द्यायला सांगत होते ही बाब समोर आली आहे. काही जणांनी दोडामार्ग तहसीलदार यांच्या निदर्शनास देखील ही बाब आणून दिली.
त्यांच्या गाडीतून महसूल कर्मचारी फिरतात यावरून अवैध दगड खाणी संबंधित कर्मचारी यांचे साटेलोटे आहेत हे सिद्ध होते जनतेला न्याय काय देणार दोडामार्ग तालुक्यातील महसूल यंत्रणा भ्रष्ट कारभारात आहे असा आरोप त्यांनी करत करीत २६ जानेवारी रोजी आपण तहसीलदार कार्यालय येथे उपोषणाला बसणार आहे असे सांगितले.