
दोडामार्ग : कार्तिकी एकादशी निमित्ताने दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावच्या विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी तुकाराम वारकरी संप्रदाय मंडळींनी दोडामार्ग ते झोळंबे गावापर्यंत पायी दिंडी काढली. या दिंडीत मोठया संख्येने वारकरी सहभागी झाले होते. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झोळंबे गावच्या विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. 12 व 13 नोव्हेंबर रोजी सुद्धा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले आहे. मंगळवारी एकादशी दिनी भजन प्रवचन दुपारी महापूजा व कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत.