
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.७४ टक्के लागला असून दोडामार्ग इंग्लिश स्कूल दोडामार्गचा विद्यार्थी हर्ष महेश कासार याने ९६.६० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळविला आहे. तर करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूल साटेली भेडशीची विद्यार्थिनी उज्वला पुरुषोत्तम देसाई ९६.२० टक्के गुण मिळवत द्वितीय तर कीर्ती विद्यालय घोटगेवाडीचा विद्यार्थी सौरभ प्रकाश देसाई ९५.८० टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
तालुक्यातील एकूण १६ प्रशालांपैकी १५ प्रशालांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्यातून एकूण ३९० विद्यार्थी दहावीच्या परिक्षेस बसले होते. पैकी ३८९ विद्यार्थी पास झाले आहेत. तालुक्यातील शाळानिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी खालीलप्रमाणे..
१) नूतन विद्यालय कळणे १०० टक्के, प्रथम यशवंत अविनाश भुजबळ ९३.८० टक्के, द्वितीय तनिष्का विजय दळवी ९२.६० टक्के व तृतीय अवनी अनंत धुपकर ८८.४० टक्के
२) करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूल साटेली-भेडशी- १०० टक्के, प्रथम उज्वला पुरुषोत्तम देसाई ९६.२०टक्के, द्वितीय हलीमा मशुद करोल ९५.४० टक्के व तृतीय विभागून ओम वसंत गवस व मानसी दीपक घाडी ९३.२० टक्के
३) शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे १०० टक्के, प्रथम आर्या आनंद नाईक ९३.८० टक्के, द्वितीय सानिया रमेश कुंभार ९२.४० टक्के व तृतीय मानसी सुनील गवस ९२.२० टक्के
४) दोडामार्ग इंग्लिश स्कूल दोडामार्ग १०० टक्के, प्रथम हर्ष महेश कासार ९६.६० टक्के, द्वितीय आर्या आनंद राठये ८५.२० टक्के व तृतीय पोर्णिमा विठ्ठल पवार ८४.४०टक्के
५) माध्यमिक विद्यालय सोनावल १०० टक्के, प्रथम खुशी ज्ञानेश्वर गवस ८५.२० टक्के, द्वितीय आर्या ज्ञानेश्वर गवस ८०.४० टक्के व तृतीय तेजस्विनी संतोष सावंत ७९.४० टक्के
६) बापूसाहेब देसाई विद्यालय उसप १०० टक्के, प्रथम नुपूर नकुळ धुरी ८८.४० टक्के, द्वितीय यश केशव सावंत ८५.४० टक्के व तृतीय कुणाल केशव नाईक ८२टक्के
७) न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी १०० टक्के, प्रथम भार्गवी शंकर गोलम ८७.८० टक्के, द्वितीय समिधा संतोष दळवी ८४ टक्के व तृतीय हर्षिता प्रमोद शेटवे ८३.६० टक्के
८) कीर्ती विद्यालय घोटगेवाडी १०० टक्के, प्रथम सौरभ प्रकाश देसाई ९५.८० टक्के, द्वितीय गौरी रमेश सावंत ९२.६० टक्के व तृतीय सारा संजय मणेरीकर ९०.२० टक्के
९) एम आर नाईक विद्यालय कोनाळकट्टा १०० टक्के, प्रथम पुष्कर दशरथ माणगावकर ९१.४० टक्के, द्वितीय हेरंब सुशांत मणेरिकर ९१ टक्के व तृतीय मिताली निवास लोंढे ८३.६० टक्के
१०) सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कुडासे १०० टक्के, प्रथम आर्या संतोष देसाई ९३.२० टक्के, द्वितीय ईश्वरी अजय देसाई ८७.६० टक्के व तृतीय आयुष नरेश गवस ८६ टक्के
११) समाजसेवा हायस्कूल कोलझर १०० टक्के, प्रथम जय प्रल्हाद सावंत ९४.२० टक्के, द्वितीय लक्ष्मीकांत धीरज सावंत ९१.६० टक्के व तृतीय गोविंद विश्वनाथ नाईक ८६.४० टक्के
१२) माध्यमिक विद्यालय झरेबांबर १०० टक्के, प्रथम वैष्णवी वसंत न्हावी ८९.४० टक्के, द्वितीय समिक्षा देवानंद माणगांवकर ८७ टक्के व तृतीय वैष्णवी विजय नाईक ८२ टक्के
१३) माध्यमिक विद्यालय मांगेली १०० टक्के, प्रथम सानिका श्रीदास मोरगावकर ८७. ८० टक्के, द्वितीय मंदा सुरेश गवस ८३. २० टक्के व तृतीय अजय भरत गवस ७४. २० टक्के
१४) माध्यमिक विद्यालय झोळंबे १०० टक्के, प्रथम सुयश गवस ८३ टक्के, द्वितीय साईप्रसाद कृष्णा गवस ८२.४० टक्के व तृतीय मुकेश गवस ७६.४० टक्के
१५) नवदुर्गा माध्यमिक विद्यालय आयी १०० टक्के, प्रथम ऋग्वेद रघुनाथ पार्सेकर ७४.४० टक्के, द्वितीय वीणा कालिदास गवस ७३.६० टक्के व तृतीय सचिता वासुदेव घोलकर ७०.२० टक्के
१६) माध्यमिक विद्यालय माटणे ९६.५५ टक्के, प्रथम अश्विनी आनंद गवस ९०.२० टक्के, द्वितीय साईराज कृष्णा शिरोडकर ८५.४० टक्के व तृतीय संचिता साजू गवस ८०.४० टक्के