
दोडामार्ग : दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचे सन २०२१-२२ या वर्षाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये तालुका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दै. तरुण भारतचे पत्रकार तेजस देसाई, तर उदयोन्मुख पत्रकार पुरस्कार गजानन बोंद्रे यांना जाहीर झाला आहे.
दोडामार्ग तालुका पत्रकार समितीची बैठक नुकतीच दोडामार्ग येथे घेण्यात आली. या बैठकीला अध्यक्ष सुहास देसाई, सदस्य रत्नदीप गवस, संदिप देसाई, तेजस देसाई, गणपत डांगी, संदेश देसाई, समीर ठाकूर, ओम देसाई, गजानन बोंद्रे उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यात आडाळी सरपंचपदी निवडून आलेले पराग गावकर, केर-भेकुर्ली ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवडून आलेले तेजस देसाई व पिकुळे ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आलेले रत्नदीप गवस यांचा सत्कार केला. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन दोडामार्ग हळबे कॉलेज मध्ये साजरा केला जाणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष सुहास देसाई यांनी केले आहे.