दोडामार्गात शिवसेनेच्यावतीने विकासकामांचं भूमिपूजन - लोकार्पण

तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, पदाधिकारी - स्थानिक लोकप्रतिनधींची उपस्थिती
Edited by: संदीप देसाई
Published on: January 16, 2024 14:11 PM
views 94  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या रस्ते भूमिपूजन व सौर हायमास्टचे लोकार्पण नुकतेच तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस , पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात आले. 

    यात मोरगाव टाकवाडी रस्ता नुतनीकरण करणे व मोरगाव गावठाणवाडी रस्ता खडिकरण आणि डांबरीकरण करणे तसेच साटेली भेडशी येथील ख्रिश्चनवाडी ते शांतादुर्गा मंदीर या रस्त्याचे नुतनीकरण करणे या विकासकामांचा शुभारंभ शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते झाला.  पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या दोन्ही कामांसाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रत्येकी १५ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे गणेशप्रसाद गवस यांनी सांगितले.

        शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधुन तालुक्यात विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. मोरगाव टाकवाडी या रस्त्याचे शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते श्रीफळ वढवून भुमीपूजन करण्यात आले. तर मोरगाव ब्रम्हपुरी या रस्त्याचे पंचायत समिती माजी सभापती गणपत नाईक यांच्या हस्ते नारळ वढवून भुमीपूजन करण्यात आले. यावेळी मोरगाव सरपंच संतोष आईर, जिल्हा परिषदे माजी बांधकाम सभापती तुकाराम बर्डे, रामदास मेस्त्री, बाबाजी देसाई, भगवान गवस, मोरगाव माजी उपसरपंच दादबा ठाकूर, श्रीकृष्ण वालावलकर, प्रताप देसाई, आडाळी सरपंच पराग गांवकर, सासोली सरपंच संतोष शेट्ये, गजानन पावसकर आदि उपस्थित होते. दोन्ही कामे मंजूर झाल्याबद्दल सरपंच आईर व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

      तर साटेली ख्रिश्चनवाडी ते शांतादुर्गा मंदिर मंजुर रस्ताचे भूमिपूजन  शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते श्रीफळ वढवून करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, साटेली-भेडशी सरपंच श्रीमती छाया धर्णे, साटेली गावचे प्रमुख मानकरी पांडुरंग धर्णे, उपतालुकाप्रमुख दादा देसाई व मायकल लोबो, विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, संजय गवस, उपसरपंच सौ‌. डिंगणेकर, शाखाप्रमुख सत्यवान धर्णे, उपतालुकाप्रमुख सफोरा शेख, अमर राणे, गणपत डिंगणेकर, विष्णु सुतार, ईसाक खेडेकर, किरण तारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


कुडासे येथे सातेरी मंदिर परिसरात दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या सौर हाईमास्टचे उदघाटनही सोमवारी करण्यात आले. त्यावेळी गणेशप्रसाद गवस, दादा देसाई, रामदास मेस्त्री, यांसह गसरपंच पूजा देसाई, भगवान गवस, ग्रामपंचायत सदस्य राजाराम देसाई, प्रसाद कुडासकर, नम्रता देसाई, आत्माराम उर्फ निलेश देसाई उपसरपंच, शाखा प्रमुख किशोर देसाई तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

  

मणेरी येथील हाईमास्टचे उदघाटन गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते झाले. येथे भगवान गवस, गावच्या सरपंच श्रीम. कांबळे , आत्माराम नाईक, अरुण नाईक तसेच मणेरीतील ग्रामस्थ उपस्थित होते.