
दोडामार्ग : प्रसिद्ध गायक पंडित अजित कडकडे यांच्या भावगीत भक्तीमय गीतांच्या सुरेलमय सांगिताने संपूर्ण पिकुळे गाव व दोडामार्ग तालुका भक्तीमय झाला होता. २५ वर्षाच्या अवधी नंतर अजित कडकडे यांचे दोडामार्गात गायन पहावयास मिळाले. २५ वर्षांच्या कालखंडा नंतर प्रख्यात प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा बहारदार गायनाचा कार्यक्रम झाला होता. पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई व धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ व श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयच्या ५० व्या सुवर्णं महोत्सव शनिवार २२ मार्च व २३ मार्च असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले.
पिकुळे शाळेच्या भव्य पटांगणावर हे दोन दिवस कार्यक्रम पार पडले. यात, दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी २३ मार्च रोजी भावगीत भक्ती गीताचे प्रख्यात प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा भारदार कार्यक्रम सम्पन्न झाला. त्यांचे गायन पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी पिकुळे व दोडामार्ग तालुकाच नव्हे तर गोवा सिंधुदुर्ग मधून भजनी प्रेमी अजित कडकडे यांना मानणारे सर्व रसिक मोठ्या संखेने जमले होते. शाळेचे पटांगण भरून आजू बाजूला रसिक प्रेक्षक थांबले होते. गायनाचा कार्यक्रम कोणालाही चुकू नये यासाठी मंडळाच्या वतीने रस्त्याच्या बाजूला लाईव्ह टेलिकास्ट स्क्रीन लावली होती. त्या स्क्रीन वरून कडकडे यांचे गायन प्रेक्षकाना दाखविले जातं होते. तर दुसर म्हणजे सदरचा दोन दिवस चाललेला कार्यक्रम व अजित कडकडे यांचे गायन थेट कोकणसाद लाईव्हने जनतेला दाखविले होते. बऱ्याच भजनी प्रेमिनी कोकणसाद लाईव्हने पिकुळे येथून अजित कडकडे यांचा कार्यक्रम लाईव्हने दाखविल्याने भजनी प्रेमिनी कोकणसाद लाईव्हचे ही आभार मानले. गायक अजित कडकडे यांच्या गायनाला हार्मोनियम प्रकाश वगळ, तबला रुपक वझे, पखवाज दिनकर भगत, ताळ उल्हास दळवी, सहगायक किशोर देसाई, ऍड दिलीप ठाकूर यां सर्वांनी साथ दिली.