
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात बुधवारी सायंकाळी गडगडाटासह व वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आसून तालुक्याचा वीज पुरवठाही खंडित झाला आहे.
सायंकाळी उशिरा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांवर तसेच रस्त्यावर तसेच वीज वाहिन्यांवर मोठमोठी झाडे उन्मळून व तुटून पडल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले. घरांची पडझड झाली असून वीज वाहिन्या तुटल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
दरम्यान तालुक्यातील दोडामार्ग आयी, दोडामार्ग -वीजघर, दोडामार्ग - मोरगाव सह कोलझर दशक्रोशीतीलही अनेक गावांच्या मुख्य मार्ग व उपमार्गावर अनेक झाडे पडली आहेत. तसेच काही अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे वीज खांब पडल्याने वाहिन्या तुटल्या आहेत. वीज वायरमन, कर्मचारी, अधिकारी लाईट सुरु होण्यासाठी मेहनत घेत आहेत.