दोडामार्ग कार्यालयांतर्गत गावांचा वीजपुरवठा दुपारपर्यंत बंद राहणार !

Edited by: संदीप देसाई
Published on: April 22, 2024 04:46 AM
views 64  views

दोडामार्ग : ३३ केवी इन्सुलि सासोली लाईन देखभालीसाठी सोमवारी २२ एप्रिल 2024 सोमवार रोजी सकाळी साधारण 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 220 केवी इन्सुलि उपकेंद्रातून वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे दोडामार्ग शाखाकार्यालयाअंतर्गत येणा-या मणेरी, आंबेली, दोडामार्ग, गिरोडे, वझरे, अंबडगाव, माटणे, आयी, विर्डी, तळेखोल गावातील वीज पुरवठा बंद राहिल.

काम लांबल्यास वीज पुरवठा चालू करण्यास विलंब लागू शकतो यांची सर्व ग्राहकानी नोंद घ्यावी, असे आवाहन दोडामार्ग वीज वितरण कडून करणेत आले आहे.