
दोडामार्ग : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने दोडामार्ग शहरात सोमवारी दुपारी संचलन करण्यात आले. यामध्ये दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी कर्मचाऱ्यांसह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी जवान सहभागी झाले होते. विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदाना निमित्त दोडामार्ग तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज व सतर्क झाली आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग पोलीस ठाण्यामध्ये केंद्रीय सुरक्षा बल बंदोबस्तासाठी दाखल झाले होते. राजकीय वातावरणात कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी व तेथील परिस्थिती योग्य हाताळण्यासाठी हे बल त्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमी सोमवारीवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व दोडामार्ग पोलीस निरीक्षक यांच्यासह दोडामार्ग पोलीस यांनी दोडामार्ग शहरात दोडामार्ग आयी रोड, तसेच बांदा रोड, भेडशी रोड गोवा रोडवर संचलन केले.