
दोडामार्ग : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांच्या निर्देशाच्या अनुषंगाने “एक विद्यार्थी एक झाड” व “हर घर नर्सरी” हि संकल्पना कसई-दोडामार्ग शहरामध्ये राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत प्रत्येकाने एक झाड लावावे तसेच नागरीकांनी घरो घरी नर्सरी तयार करावी असे आव्हान नगरपंचायत मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांनी केले आहे.
या उपक्रमांतर्गत नगरपंचायत कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था दोडामार्ग, सावंतवाडा इंग्लिश स्कुल दोडामार्ग या ठिकाणी शहरातील नागरिक, विद्यार्थी, नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगार यांचेकडून उत्साहाने वृक्षारोपण तसेच हरित शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमास नगरपंचायतचे मुख्याधिकारी संकेत गायकवाड, क्रांती जाधव (महिला व बालकल्याण सभापती), श्रीम. संध्या प्रसादी (शिक्षण व आरोग्य सभापती), ज्योती जाधव, संजना म्हावळणकर तसेच कार्यालयीन कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संवर्धनास चालना देणे आणि नागरिकांच्या सहभागातून हरित चळवळीला बळकटी देणे हा होता. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासाठी महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.